रायगड : तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाल्या मुख्य शासकीय इमारती...

25 Jan 2021 21:24:22
Raigad District _1 &
 
भारतीय प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी
अलिबाग : उद्या 26 जानेवारी, भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन. या राष्ट्रीय सणाच्या पूर्वसंध्येला रायगड जिल्ह्याच्या मुख्य शासकीय इमारतीच्या तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाल्या आहेत.
 
रायगडात भारतीय प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. यानिमित्ताने अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय व रायगड जिल्हा न्यायालय या इमारतींना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Raigad District _1 &
 
तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघालेल्या या इमारतींचे विलोभनीय दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. या इमारती सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून, अनेकजण हे दृश्य आपल्या मोबाईलच्या कॅमेर्‍यात टिपताना दिसत आहेत.

Raigad District _1 & 
 
 
Powered By Sangraha 9.0