रायगड किल्ला 3 ते 7 डिसेंबरपर्यंत पर्यटनासाठी बंद राहणार

सुरक्षिततेच्या कारणावरुन किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय

By Raigad Times    01-Dec-2021
Total Views |
 Raigad Fort Kille Raigad_
 
अलिबाग । किल्ले रायगड, रायगड रोप-वे व रायगड किल्ल्याच्या आजूबाजूकडील परिसर सुरक्षिततेच्या कारणास्तव दि. 3 ते 7 डिसेंबर या कालावधीत पर्यटनाकरिता बंद राहणार आहे.
3 डिसेंबर ते 7 डिसेंबरपर्यंत किल्ले रायगड, रायगड रोप-वे, रायगड किल्ल्याच्या परिसर तसेच माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचाड रोड व नातेगाव ते पाचाड बाजूकडील रस्ताही सुरक्षिततेच्या कारणास्तव पर्यटकांकरीता बंद करण्यात येत आहेत.
 
गैरसोय होऊ नये, याकरिता पर्यटकांनी याची दखल घेण्याचे आवाहन रायगड पोलिसांकडून करण्यात आले आहे.