पनवेल: ‘स्पा’ च्या नावाखाली अश्‍लिल वर्तन करणार्‍या महिलांविरुद्ध पोलिसांची कारवाई

By Raigad Times    02-Apr-2021
Total Views |
panvel news1_1  
 
पनवेल । स्पा च्या नावाखाली गिर्‍हाईकांशी अश्‍लिल तसेच बीभत्स वर्तन करणार्‍या महिला आरोपींविरुद्ध पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
 
पनवेल शहरातील स्टेशन रोड परिसरातील यशोनारायण बिल्डींग शॉप नं-23 येथे रिअल लुक फॅमिली सलून अ‍ॅण्ड स्पा दुकान थाटण्यात आले होते. या स्पा च्या दुकानाच्या नावाखाली अश्‍लिल व गैरवर्तनाचे व्यवहार सुरू असल्याची माहिती पनवेल शहर  पोलिसांना मिळताच नवी मुंबई परिमंडळ-2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले-पाटील यांच्या आदेशानुसार पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जोशी यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सुनिल तारमळे व पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी बोगस गिर्हाईक पाठवून याबाबतची शहानिशा केली व त्याठिकाणी छापा टाकून आरोपी दिशा बाळासाहेब पायाळ (वय-23, रा.कळंबोली), सुनिता सॅनिअल वोनियार (वय-48, रा.कळंबोली) व काजल शिवकुमार गौतम (वय-20, रा.नावडे फाटा) यांना ताब्यात घेतले. तसेच सदर ठिकाणावरुन रोख रक्कमेसह इतर ऐेवज असा मिळून 9 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
 
सदरची कारवाई पोना परेश म्हात्रे, पोशि सुनिल गर्दनमारे, पोशी यादवराव घुले, पोना युवराज राऊत, पोशी विवेक पारासूर, मपोशि गोडसे, मपोशि लांघी यांनी केली असून सदर प्रकरणाचा अधिक तपास गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सुनिल तारमळे हे करीत आहेत.