File Photo
तिकीट दरात केली वाढ
उरण (घनःश्याम कडू) । दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मोरा-भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरात बुधवारपासून 20 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पावसाळी हंगामासाठी दरवाढ केल्याने सागरी प्रवास महागणार आहे.
दरवर्षी पावसाळी हंगामात मोरा-भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात भरमसाठ वाढ केली जाते. गतवर्षीही तिकीट दरात 15 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना तिकीटासाठी 70 रुपये मोजावे लागत होते. यावर्षीही मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेने पावसाळी हंगामासाठी तिकीट दरात 70 रुपयांंवरुन 90 रुपयांपर्यंत वाढ केली आहे.
ही दरवाढ बुधवार 26 मेपासूनच लागू करण्यात आल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षक प्रभाकर पवार यांनी दिली.