मुरुड : राजपुरी येथे दरड कोसळली; 4 घरांचे नुकसान

18 Jul 2021 23:56:33
Murud_Rajpuri_1 &nbs
 
24 व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविले
 
मुरुड : मुरुड तालुका व परिसराला पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. रविवारी (१८ जुलै) सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत 215 मिलीलिटर पावसाची नोंद झाली आहे.

Murud_Rajpuri_2 &nbs 
 
मुरुड तालुक्यातील राजपुरी येथे दरड कोसळली. या घटनेत 3-4 घरांचे नुकसान झाले आहे. तर एकूण 5 कुटुंबातील 24 व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. राजपुरी येथे दरड कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी १२ जुलैला राजपुरी येथील एका झोपडीवर दरड कोसळून नुकसान झाले होते.
Powered By Sangraha 9.0