सावित्रीने धोका पातळी ओलांडल्याने पूरपरिस्थिती
महाड । महाड तालुक्याला मुसळधार पावसामुळे सावित्री नदीने धोका पातळी ओलांडली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराचे पाणी शिरल्यामुळे येथील गंभीर परिस्थिती उद्भवली आहे.
पाणी शिरल्यामुळे तालुक्यात एनडीआरएफची टीम बोलावण्यात आली असून कोर्स्टगार्डची टीम दाखल झाली आहे.
महेश सानप, साळुंखे रेस्क्यू टीमही मदतीसाठी सक्रीय आहे.
बुधवारी (21 जुलै) सकाळी 8 ते आज सकाळी 8 वाजता संपलेल्या चोवीस तासांत महाड तालुक्यात 207 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तर सावित्री नदीने 6.50 मीटर ही धोकापातळी ओलांडली असून, सध्या ती 9.10 मीटर पाणी पातळीवरुन वाहत आहे.