पोलादपूरातील केवनाळे, गोवेले सुतारवाडी येथे भूस्खलन; दरडीखाली 11 जणांचा मृत्यू

23 Jul 2021 15:08:07
Poladpur Land sliding_1&n
 
13 जखमींवर उपचार सुरु
 
पोलादपूर (शैलेश पालकर) । पोलादपूर तालुक्यातील गोवेले सुतारवाडी आणि केवनाळे येथे दरड कोसळल्याची घटना घडली होती. याठिकाणी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु असून, केवनाळे येथील 6 जणांचा तर गोवेले सुतारवाडी येथे 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.

Poladpur Land sliding_2&n 
 
पोलादपूर तालुक्यातील गोवेले ग्रामपंचायत हद्दीमधील सुतारवाडी येथे गुरुवारी (22 जुलै) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. यावेळी कोसळलेल्या दरडीखाली सुमारे आठ ते दहा घरे भुईसपाट झाली आहेत. काही घरे दरडीसोबत दरीसदृश्य उतारावर वाहून गेली आहेत.

Poladpur Land sliding_3&n
 
गुरुवारी रात्री ही घटना कळल्यानंतर प्रशासनाने तसेच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचण्यासाठी आढावा घेतला असता कापडे ते कामथे बोरघर रस्त्यावरील कापडे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरील खांबेश्वरवाडीला जोडणारा पूल अर्धा मधोमध तुटून वाहून गेल्याचे दिसून आले.

Poladpur Land sliding_4&n 
 
याखेरीज, साखर बोरज येथील पुलदेखील तुटून वाहून गेल्याने गोवेले गावाकडे कोणत्याही प्रकारचे मदतकार्य पोहोचविणे यंत्रणांना शक्य नाही असे दिसून आले. त्यामुळे पहाटेच्या सुमारास पोलादपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी गोवेले सुतारवाडी येथे रवाना झाले.

Poladpur Land sliding_5&n
 
स्थानिकांच्या मदतीने सकाळी बचावकार्याला सुरुवात झाली. यावेळी दरडीच्या ढिगार्‍याखालून केवनाळे येथून 6 जणांचे तर गोवेले सुतारवाडी येथील 5 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

Poladpur Land sliding_6&n 
 
तर गोवेले सुतारवाडी येथील 10, केवनाळे येथील 2 आणि कुंभार्डे येथील 1 अशा 13 जखमींना बाहेर काढण्यात आले असून, या सर्वांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Poladpur Land sliding_7&n 
Powered By Sangraha 9.0