- नागरिकांची होती पळापळ, अनेकांनी गाव सोडले
- नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नका
- जिल्हा प्रशासनाचे आवाहन
अलिबाग । महाड येथील लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल कंपनीत वायूगळती होऊन मोठा स्फोट होण्याची अफवा पसरली असल्याने नागरिक भयभीत होवून मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले आहेत. अफवेमुळे नागरिकांची पळापळ सुरु झाली. अनेकांनी गाव सोडले. मात्र या ठिकाणी कोणताही धोका नसून, नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये व राहते घर सोडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल कंपनी, महाड या ठिकाणी तज्ञ उपस्थित असून कोणताही धोका नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये व राहते घर सोडू नये. बरेच नागरिक वाहने घेऊन मुंबई गोवा महामार्गावर आल्याने बिरवाडी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. त्यामुळे महाड येथे पाठविण्यात येत असलेली अन्न-पाण्याची मदत पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला आहे.
मात्र नागरिकांनी घाबरुन जाऊ नये व आपापल्या घरी परतावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.