रायगड पोलीस दलातील 3 अधिकार्‍यांना पोलीस पदक, विशेष सेवा पदक जाहीर

By Raigad Times    15-Aug-2021
Total Views |
Raigad Police_1 &nbs
 
अलिबाग । रायगड पोलीस दलातील 3 अधिकार्‍यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल 2021 चे पोलीस पदक व नक्षलग्रस्त भागात कठीण व खडतर कामगिरीबद्दल विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय सावंत यांना पोलीस पदक तर रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धनाजी काळे व नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत काळे यांना विषेश सेवा पदक जाहीर झाले आहे.
 
आज (15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते व जिल्ह्याधिकारी निधी चौधरी, रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या उपस्थितीत या पदकप्राप्त अधिकार्‍यांना गौरविण्यात येणार आहे.
 
1) संजय वसंत सावंत पोलीस, उपनिरीक्षक (वाचक शाखा)
 
हे 9 फेब्रुवारी 1988 रोजी रायगड जिल्हा दलात भरती झाले असून ऑक्टोबर 2020 पासून ते वाचक शाखा येथे कार्यरत आहेत. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर असून त्यांनी एम.कॉम व संगणक क्षेत्रात एम.सी.ए असे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना त्यांच्या सेवाकाळात आतापर्यंत पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह (2011) तसेच 325 बक्षिसांनी गौरविण्यात आलेले आहेत. सावंत यांनी 34 वर्षे उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल त्यांना स्वातंत्र्यदिन सन 2021 चे गुणवत्तपूर्ण सेवेबद्दल चे राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाल्याने त्यांना गौरविण्यात येत आहे.
 -----------------------------------
2) धनाजी बहिरु काळे, पोलीस उपनिरीक्षक (रसायनी पोलीस ठाणे)
 
पोलीस उपनिरीक्षक धनाजी काळे यांनी गडचिरोली नक्षलग्रस्त जिल्ह्यात येथे ऑगस्ट-2017 ते डिसेंबर-2020 या कालावधीत सलग 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी खडतर सेवा यशस्वीरित्या सेवा पूर्ण केली. त्यांनी गडचिरोली टव्वे जंगल परिसर, बोटझरी जंगल परिसरात प्रत्यक्ष नक्षलविरोधी चकमक अभियानात सहभाग घेवून नक्षलवाद्यांचा यशस्वी बिमोड केला तसेच डिसेंबर-2019 मध्ये घडलेला जांभूळखेडा ब्लास्ट व एकूण 106 गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात सहभागी असलेला प्रमुख जाहाल नक्षलवादी दिनकर उर्फ शिवराम बिकारू गोटा यास जेरबंद करण्याची महत्वाची कामगिरी बाजावली आहे. वरील नमूद उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना मे-2019 मध्ये पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त झाले आहे.त्यांनी नक्षलग्रस्त भागात बजावलेल्या खडतर व कठीण सेवेबद्दल विशेष सेवा पदकांनी गौरविण्यात येत आहे.
-----------------------------------
3) श्रीकांत राजाराम काळे, पोलीस उपनिरीक्षक (नेरळ पोलीस ठाणे)
 
पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत काळे यांनी गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात भामरागड येथील पोलीस मदत केंद्र धोडराज येथे ऑगस्ट-2017 ते डिसेंबर-2020 या कालावधीत सलग 03 वर्षापेक्षा जास्त कालावधी समाधानकारपणे व यशस्वीरित्या सेवा पूर्ण केली. श्री.श्रीकांत राजाराम काळे यांनी नक्षलवाद विरोधी मोहीम राबविताना जंगल परिसरात दीर्घ पल्ल्याचे व आखूड पल्ल्याचे अभियान नाईट अ‍ॅम्युश, रोड सर्च व रोड ओपनिंग सारखे अभियात सक्रीय सहभाग घेवून ती यशस्वी केली.
त्याचप्रमाणे हद्दीतील नक्षली कारवायांना परिणामकारक आळा घालून जिल्हा परिषद निवडणूक, ग्रामपंचायत निवडणूक तसेच व्हीआयपी, व्ही-व्हीआयपी इत्यादी कठीण कामगिरी बजावल्याबद्दल विशेष सेवा पदकाने त्यांना गौरविण्यात येत आहे.
 
वरील पदक प्राप्त अधिकार्‍यांचे रायगड पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी अभिनंदन केले.