पालीमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत; 11 वर्षांच्या मुलाला घेतला चावा

24 Aug 2021 15:08:14
Pali_Street Dogs_web_1&nb
 
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
 
सुधागड-पाली (गौसखान पठाण) । पाली शहरात भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. नुकताच येथील कुंभार आळीत राहणार्‍या पार्थ प्रसाद लखिमले या 11 वर्षांच्या मुलाला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. ठिकठिकाणी फिरणार्‍या या मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
 
पालीतील हटाळेश्वर चौक, बाजारपेठ, बसस्थानक, बँक ऑफ इंडियाजवळ व सर्व आळ्यांमध्ये तसेच कचरा कुंड्यांजवळ भटक्या व मोकाट कुत्र्यांचा झुंडीत वावर असतो. त्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. रात्री व दिवसादेखील हे कुत्रे टोळक्याने फिरतात. एखादा पादचारी किंवा दुचाकी वाहन दिसले की थेट त्यांच्यावर धावून जातात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Pali_Street Dogs_3_1 
 
भटक्या कुत्र्यांमध्ये कधीकधी जुंपते. त्यामुळे रस्त्यावरुन जाणार्‍या वाहनांना अपघात होण्याचा धोकादेखील वाढला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून वारंवार केली जात आहे. मात्र याकडे स्थानिक प्रशासनाकडून लक्ष दिले जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
 
Pali_Street Dogs_2_1 
 
---------------------------------------------------------
 
पालीत मोकाट व भटक्या कुत्रांचा उपद्रव वाढला आहे. लहान मुले, वृद्ध व महिलांना या कुत्र्यांची सर्वांत जास्त भीती आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन लवकर उपाययोजना करावी. 
- प्रसाद लखिमले, निवृत्त सैनिक, पाली
Powered By Sangraha 9.0