मिसेस रायगड स्पर्धेत पुजा भागवत विजेती

By Raigad Times    18-Oct-2022
Total Views |
miss raigad
 
पेण | स्वररंग पेण फेस्टिवल मध्ये झालेल्या मिसेस रायगड स्पर्धेत कोपरी ठाणेच्या पूजा भागवत यांनी मिसेस रायगडचे अंतिम विजेते पद पटकावले. तर नागोठणेच्या स्मिता कुथे यांनी उपविजेते व अलिबागच्या साक्षी देवरुखकर यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जिंकले. तसेच या स्पर्धेतील बेस्ट कॉस्टयूमच निधी मोरे, बेस्ट स्माईल सौम्या भगत , बेस्ट पर्सनॅलिटी प्रीती पाटील , बेस्ट फोटोजनिक कांचन म्हात्रे , बेस्ट हेअर ननीत भोसले , बेस्ट कॅटवॉक सुरभी कार्लेकर या स्पर्धकांनी पारितोषिके पटकाविले.
 
स्वररंग पेणने आयोजित केलेल्या पेण फेस्टिवल २०२२ चा शुभारंभ उत्साहात भाजप पेण विधानसभा संयोजक वैकुंठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या फेस्टिवलचे उदघाटन करण्यात आले. यावेळी स्वररंगचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र साळवी, उपाध्यक्ष सुनिल पाटील, खजिनदार भारती साळवी, शर्मिला पाटील, सारिका पाटील, सचिव कौस्तुभ भिडे, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, कृष्णा वर्तक, शिबूकुमार सिके, सचिन मोदी, मयूर सुर्वे, तन्वी पाटील, महेश भिकावले, संदीप पाटील, श्रेया कुंटे, अनिकेत साळवी, मृगज कुंभार, अनिरुध्द पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
 
पेण फेस्टिवल म्हणजे पेणची शान असून ग्रामीण भागातील जत्रेतून जसा आनंद मिळतो तसा आनंद या पेण फेस्टिवल मधून मिळत असून छोट्या व्यावसायिकांना तसेच कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळून त्यांच्या कलागुणांना वाव मिळत असतो. मिसेस रायगड, मिस्टर रायगड, मिस रायगड, रॅम्प ऑक, फॅशन शोच्या माध्यमातून अनेकांचे भवितव्य घडले आहे. १४ वर्ष पेण फेस्टिवलचे यशस्वी आयोजन करून सातत्य राखले आसल्याचे वैकुंठ पाटील यांनी या वेळी सांगितले.