नेरळ बस स्टँड येथील पुलाला सुरक्षा रेलिंग नसल्याने मोटरसायकल स्वार पत्नीसह खाली पडला.

18 Oct 2022 17:36:06
bike fall
 
कर्जत  | नेरळ बस स्टँड येथे जाण्याच्या मार्गात असलेल्या नाल्यावरील पुलावरून मोटरसायकल स्वार आपल्या पत्नीला सोबत घेवून जात असता समोरच्या वाहनाला साईट देत असताना पुलाला रेलिंग नसल्याने खाली पडला. या अपघातात या पती पत्नीला जबर मार लागल्याने रुग्णालयात उपचारा साठी नेले.
नेरळ पूर्व परिसरात येत असलेला बस स्टँड जवळ दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास बाजार खरेदीसाठी पती पत्नी हे आपल्या मोटारसायकलने आले होते. घरी परतत असताना समोरून येणार्‍या वाहनाला साईड देण्याच्या नादात मोटारसायकल स्वार थेट नैसर्गिक नाल्यावर बांधण्यात आलेल्या पुलावरून खाली कोसळला. पुला जवळ रस्ता अरुंद असून येथून समोरील येणार्‍या मोठ्या वाहनाला जागा देणे गरजेचे असते परंतु या नाल्याच्या पुलाला गेली कित्येक वर्षे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना केली गेली नसल्याने नेहमीच छोटे मोठे अपघात घडत असतात. या पुलावर रेलिंग लावावेत अशी मागणी होत आहे.
Powered By Sangraha 9.0