सीएनजी बाटला टेस्टिंग सेंटरची लुटमार

By Raigad Times    04-Oct-2022
Total Views |
cng2 
 
पनवेल | पेट्रेाल परवडत नसल्याने व प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्याकरीता आता सर्वच रिक्षा या सीएनजीवर चालविल्या जात आहेत. सीएनजी बाटल्याची टेस्टिंग ही तीन वर्षांनी करावी लागते. पूर्वी या टेस्टिंग सेंटरकडून या टेंस्टींगसाठी ४०० ते ७०० रुपयांमध्ये होत असे. आता तो दर २००० रुपये करण्यात आला आहे. टेस्टींगचे २००० व पासिंगचे आणखी ५०० रुपये आकारुन रिक्षा चालकांची लूट युनियन करुन करत आहेत.पनवेलमध्ये हजारो रिक्षा आहेत तर हे बाटले टेस्टिंग सेंटरची संख्या केवळ ४ ते ५ एवढीच आहे. या चार ते पाचजणांनी संगनमत करुन हे दर वाढवले आहेत.
 
 
पूर्वी या चार ते पाच जणांमध्ये स्पर्धा होती त्यामुळे आपल्याकडे रिक्षाचालक यावेसाठी दरामध्ये तफावत असायची त्यामुळे रिक्षाचालकांचा फायदा व्हायचा कोण ४०० रुपयांमध्ये बाटला टेस्टिंग करायचा तर कोण ६०० रुपयांना त्यामुळे ज्या ठिकाणी स्वस्त बाटला टेस्टिंग होत असे त्या ठिकाणी रिक्षाचालक जात असत.
 
मात्र हे सेंटर चालविणार्यांनी स्पर्धा टाळण्यासाठी एकजूट करुन युनियन स्थापन करुन सरसकट २००० रुपये बाटला टेस्टिंगसाठी आकारायला सुरुवात केली आहेे. त्यामुळे गरीब रिक्षाचालकांना हे दर परवडत नाही. परंतु पासिंगसाठी हे बाटला टेस्टिंग अनिवार्य असल्यामुळे ते करावेच लागते. त्यामुळे बाटला टेस्टिंगचे दरावर आरटीओने नियंत्रण आणावे अशी मागणी रिक्षाचालक करीत आहेत.