रायगडमधील सुमा सिद्धार्थ शिरूर यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर

15 Nov 2022 12:18:52
shirur
 
रायगड । केंद्र शासन क्रिडा विभागाचे सर्वोच्च क्रीडा पुरस्कार समजला जाणारा द्रोणाचार्य पुरस्कार हा रायगड जिल्ह्यातील सुमा सिद्धर्थ शिरूर यांना जहीर झाला आहे. “पॅरा शूटींग” या खेळ प्रकारात क्रीडा मार्गदर्शन केले असल्यामुळे आणि अंतराष्ट्रीय खेळाडू घडविल्यामुळे उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक म्हणून त्यांना हा द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
 
पुरस्कार वितरण दि. 30 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे प्रदान करण्यात येणार आहे. सुमा शिरूर यांचे रागड जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रिडा परिषद अध्यक्ष डॉ. महेंद्र कल्याणकर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी सुमा शिरूर यांचे अभिनंदन केले आहे.
Powered By Sangraha 9.0