माणगांव तालुक्यामधील निवडणुकांचे निकाल जाहीर; शिंदे गटाला मोठा धक्का महाविकास आघाडी यशस्वी

By Raigad Times    20-Dec-2022
Total Views |
Mangoan
माणगांव | माणगांव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी रविवारी १८ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज मंगळवार २० डिसेंबरला निकाल जाहीर झाला आहे. १६ ग्रामपंचायतीसाठी दोन टप्प्यात मतमोजणी करण्यात आली. पहिल्या टप्यात न्हावे, शिरवली, नांदवी, कुंभे, कुमशेत, दहिवली कोंड, पहेल या ८ ग्रांमपंच्यातींची मतमोजणी पार पडली यामध्ये कूंभे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास आघाडीचा सरपंच निवडून आला. तर इतर सात ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीने विजय मिळविला. शिंदे गटाला पहिल्या टप्प्यात सफशेल अपयश आलेले पाहायला मिळाले.
 
तर दुसर्‍या टप्प्यातील मतमोजणीत भागाड, मांगरूळ, मुठवली तळे, हरकोल, होडगाव, चिंचवली, साई, गोरेगाव या ८ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये मांगरूळ ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटाला विजय मिळविण्यात यश आले तर इतर सात ग्रामपंचायतींमध्ये महाविकासआघाडीचा विजय झाला आहे. १४ महाविकास आघाडी, १ बाळासाहेबांची शिवसेना, १ ग्रामविकास आघाडी असा एकुण १६ ग्रामपंचायतींचा माणगांव तालुक्यातील निकाल आहे.
 
या निवडणुकी आधीच ३ जागी बिनविरोध निकाल जाहीर झाला आहे. माणगांव तालूक्यातील हा निकाल शिंदे गटाला मोठा धक्का समजला जात आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे अर्थात महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसत असुन तशा प्रतिक्रियाही आघाडीच्या नेत्यांकडुन व्यक्त होत आहेत.