पेण तालूक्यातील २६ पैकी १६ ग्रामपंचायतीवर शेकापचे सरपंच तर भाजप कडे ४ ग्रामपंचायती, ठाकरे, शिंदे गट व कांग्रेस कडे प्रत्येकी १, अपक्षा कडे -३ ग्रामपंचायती

By Raigad Times    20-Dec-2022
Total Views |
Pen2 
पेण | पेण तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींचा सरपंच व सदस्यांचा मतमोजणी निकाल जाहीर झाला. त्यात २६ पैकी १६ ग्राम पंचायतीवर शेकापचे सरपंच विजयी झाले तर भाजपचे ४ सरपंच विजयी झाले , अपक्ष सरपंच ३ ग्रामपंचायतीवर निवडून आले. तर ठाकरे , शिंदे, कॉग्रेसने प्रत्येकी १ जांगा जिकंली कूणच पेण तालुक्यात शेकापने आपले वर्चस्व कायम राखले आहे.

Pen1 
पेण तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीवर निवडून आलेले सरपंच : कोलेटी -राजू भोईर, निगडे - कल्पना म्हात्रे, आमटेम लक्ष्मण तांबोळी, डोलवी - परशूराम म्हात्रे, मुंढाणी - सावित्री शेळके, काराव गडब - मानसी पाटील, कोप्रोली - प्रविण पाटील, मसद (बु) - हरिश्चंद्र पाटील, कणे - संगिता पाटील, पाटणोली - नलीनी वाघमारे, हमरापूर - राकेश दाभाडे, कळवे - सतीश पाटील, दादर - तेजस्वी पाटील, सोनखार - दिलीप म्हात्रे, करोटी - सूशांत बरगे, आंबिवली - अरुणा पवार, वाशिवली सखाराम पवार, जिते. सुप्रिया म्हात्रे, दूरशेत - दशरथ गावंड, वरसई - रेखा पाटील, खरोशी - रुपाली पाटील, सावरसई - आरती पाटील, वरप गणेश मनवे, सापोली - सुमन हंबीर, रोडे - दिनेश पवार, मळेघर - आश्लेषा पेणकर हे सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

Pen