म्हसळा चेक नाक्याजवळ एस टी बसला कार धडकुन अपघात

22 Dec 2022 17:02:14
Mhasla 1
म्हसळा | २२ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी साडे अकरा वाजता एस.टी.बस क्रमांक एमएच.१४ बीएफ २३२२ बस स्वारगेट कडून म्हसळा श्रीवर्धनकडे येत असताना म्हसळा साईचेक पोस्ट जवळ म्हसळा शहरा कडून जाणारी (टाटा आर्या)मोटार कार क्रमांक टीएस ०७ बीएफ २३२२ गाडीला एसटी बसला धडकली असता एसटी बस रस्त्याचे बाजूच्या नाल्यामध्ये कलंडून अपघात झाला.
Mhasla
अपघातामध्ये चिरगाव येथील शाळेकरी प्रवाशी मुलगी आर्या पाडावे किरकोळ जखमी झाली होती तीला म्हसळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार करून घरी पाठविले तर या अपघातात बस चालकाचे पायाला व हाताला मार लागला असल्याचे सांगण्यात आले. अपघातात मनुष्य हानी झाली नसली तरी अपघाती गाड्यांचे नुकसान होऊन वित्त हानी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संदीपान सोनवणे आणि पोलिस पथक तसेच स्वंयसेवी नागरिकांनी घटनास्थळी जाऊन मदत केली.
 
Powered By Sangraha 9.0