अलिबाग ; नारंगी येथील भुवनेश्वर मंदिरात शिवलिंगाचा चांदीचा मुखवट्याची चोरी

By Raigad Times    17-Feb-2022
Total Views |
narangi ganesh mandir alibag
 
मुखवट्याची चोरीमुळे भक्ताूंमध्ये खळबळ; पोलीसांकडून तपास सुरु
 
अलिबाग । तालुक्यातील नारंगी येथील पुरातन भुवनेश्वर मंदिरातील शिवलिंगावरील चांदीच्या मुखवट्याची बुधवारी चोरी झाली आहे. दरवाजाचे टाळे फोडून सुमारे अडीच लाख रुपये किंमतीचा मुखवटा चोरट्यांनी चोरुन नेला आहे. या घटनेमुळ या परिसरात खळबळ उडाली आहे.
 
narangi ganesh mandir
 
अलिबाग तालुक्यातील नारंगी येथे स्वयंभू भुवनेश्वर मंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंगावर 6 किलो वजनाचा चांदीचा मुखवटा बसविण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी मंदिराचे पुजारी गंगाधर सदाशिव म्हात्रे हे मंदिर उघडण्यासाठी आले असता त्यांना मंदिराचा एक दरवाजा उघडाच असल्याचे दिसून आले.
 
मंदिरात प्रवेश करताच दरवाजाचे टाळे तुटलेल्या अवस्थेत बाजूला ठेवण्यात आलेले दिसले. त्याच वेळी त्यांना शिवलिंगावर असलेला चांदीचा मुखवटा गायब असल्याचे दिसले. त्यामुळे मंदिरात दरोडा पडल्याचे लक्षात येताच त्यांनी पोयनाड पोलिसांशी संपर्क साधला चोरीची घटना कळताच पोलीस निरीक्षक राहुल अतीग्रे घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसराचा त्यांनी तपास सुरू केला आहे.
 
सीसीटिव्ही फुटेज तसेच श्वान पथकास पाचारण करून चोरट्यांचा तपास केला जात आहे. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.