किल्ले मर्दनगडावर शिवभक्तांच्यां उपस्थितीत गड पूजन सोहळा संपन्न

21 Feb 2022 15:55:36
kille mardangad
 
उरण | शिवरायांच्या शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधत उरण-आवरे गावाच्या दक्षिणेला असलेला शिवकालीन किल्ला मर्दनगड  मर्दनगडावर आवरे गावचे उपक्रमशील व आदर्श शिक्षक कौशिक ठाकूर सर यांच्या संकल्पनेतून व मर्दनगड संवर्धन समिती आवरे यांच्यातर्फे मर्दनगड किल्ल्यावर गडाचे गडपूजन, ध्वजपूजन आणि सोबतच तिथे येणार्‍या पर्यटकांना आणि शिवभक्तांना त्या गडाची आणि परिसराची माहिती मिळावी म्हणून किल्ल्याच्या माहिती फलकाचे अनावरण शिवभक्तांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
 
कार्यक्रमप्रसंगी गडावर उपस्थित शिवभक्तांना महाराज्यांच्या अद्भुत, अतुलनीय पराक्रमाची आणि ज्वलंत इतिहासाची गाथा आपल्या पहाडी आवाजात पोवाड्याच्या गायनाने गातं शिवशाहीर वैभव घरत यांनी गडावरचं वातावरण मंत्रमुग्ध केलं आणि सारा परिसर जय शिवाजी जय भवानीच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
 
शिवजन्मोत्सवाच औचित्य साधत साकारलेल्या शिवमय कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख मान्यवरांनी उपस्थितीत होते. उरणचे माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख माननीय मनोहरशेठ भोईर, सरपंच निराताई पाटील, संपर्क प्रमुख महादेव घरत, मनसेचे संदेश ठाकूर, रायगड भूषण राजू मुंबईकर, गणेश म्हात्रे, पत्रकार घनश्याम कडू, रमेश म्हात्रे, अशोक ठाकूर, महेश गावंड, गुरुनाथ गावंड, संतोष पाटील, अमित म्हात्रे, शाम गावंड, पद्माकर गावंड, विद्याधर गावंड सर, शिवराज प्रतिष्ठानचे गणेश तांडेल, दुर्गमावळाचे चेतन गावंड, प्रांजळ पाटील, अमित पाटील सर, रवि भोईर, नवपरिवर्तनचे किशोर पाटील, गणेश भोईर, मित्र परिवाराचे संपेश पाटील, रोशन पाटील यांच्या सह आजूबाजूच्या परिसरातील शेकडोंच्या संख्येने शिवभक्त आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
 
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संयोजक कौशिक ठाकूर सर, शंकर पाटील, अविनाश ठाकूर, दीपेश ठाकूर, प्रशांत म्हात्रे, दिलेश ठाकूर, विनोद ठाकूर, तुषार म्हात्रे, संतोष म्हात्रे, प्रमोद ठाकूर, सुजित ठाकूर, के.टी.गावंड, रोशन गावंड, मंगेश गावंड, निखिल गावंड, गुरू गावंड, अमेय ठाकूर, संदीप ठाकूर, हितेंद्र म्हात्रे, करण ठाकूर, चरण गावंड, राहुल गावंड, चंदन गावंड यांनी मेहनत घेतली तर ह्या कार्यक्रमाच सूत्रसंचालन सुनिल वर्तक यांनी केले
Powered By Sangraha 9.0