कर्जत | कर्जत आणि अंबरनाथ तालुका मराठा शिक्षण प्रसारक मंडळाची संयुक्त वार्षिक सर्वसाधारण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष मधुकर म्हसे यांची मंडळाचे अध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली.
कर्जत आणि अंबरनाथ मराठा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना 1968 साली झाली आहे.कोरोनाच्या कालखंडा नंतर प्रथमच मंडळाची संयुक्त वार्षिक सर्वसाधारण सभा मंडळाच्या कर्जत येथील वसतिगृहाच्या सभामंडपात आयोजीत करण्यात आली होती, त्यावेळी एकूण 45 सभासद हजर होते. मंडळाचे अध्यक्ष मधुकर म्हसे, उपाध्यक्ष शंकर शेलार, उपाध्यक्ष सूर्याजी ठाणगे, जेष्ठ सभासद शंकर पाटील, सदाशिव बैलमारे, भगवान घरत, वासुदेव राणे, सुरेश परशुराम भोईर आदी प्रमुख उपस्थित होते. सभेच्या कामकाजास सुरुवात झल्यानंतर विद्यमान अध्यक्ष मधुकर वामन म्हसे यांची पुढील कालावधीसाठी करिता फेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी सूर्याजी ठाणगे व शंकर शेलार यांची निवड करण्यात आली, चिटणीस म्हणून नितीन शिवराम दगडे, उपचिटणीस शिवाजी श्रीखंडे, खजिनदार सुरेश काशीनाथ भोईर यांची निवड करण्यात आली.
कर्जत तसेच अंबरनाथ तालुक्यातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे, शैक्षणिक शिबिरांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, दुर्गम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा मोफत देणे, गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करणे, त्याच प्रमाणे दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करून मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्याना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना सन्मानित करणे यांसारखे अनेक उपक्रम या मंडळाकडून राबविले जातात, सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन भानुदास म्हसे यांनी केले .