श्रीवर्धनः हारवित खाडी किनारी आढळला महाकाय देवमासा; मासा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

By Raigad Times    08-Apr-2022
Total Views |
dev masa shriwardhan
                                                                                                                           छायाचित्र ( केतन माळवदे )
मोठ्या जहाजाची धडक लागल्यामुळे तो मृत्यू झाल्याचा अंदाज
 
अभय पाटील /श्रीवर्धन । श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्टलगत असलेल्या हरवित गाव हद्दीतील खाडीच्या किनार्‍यावर प्रचंड मोठ्या आकाराचा  देवमास मासा ( व्हेल मासा ) मृतावस्थेत आढळून आला आहे. समुद्रातील मोठ्या जहाजाची धडक लागल्यामुळे तो मृत पावला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. या महाकाय माशाला पहाण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी करत आहेत.
 
dev masa shriwardhan
dev masa shriwardhan
 
हारवित येथील समुद्रकिनारी आज शुक्रवारी सकाळी महाकाय मासा मृतावस्थेत आढळला. हा मासा व्हेल प्रजातीचा असण्यासे सांगण्यात येत आहे. ग्रामस्थांना हा मासा मृतावस्थेत असल्याचे लक्षात आले.
 
dev masa shriwardhan
 
हा मासा अंदाजे 30 ते 40 फूट लांब असून दिघी पोर्ट कडे येणार्‍या तसेच समुद्रातून जाणार्‍या मोठ्या जहाजाच्या पंख्यामध्ये अडकल्याने हा मासा मृत झाला व समुद्राच्या प्रवाहासोबत किनार्‍यावर आला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

dev masa shriwardhan