रोहा | जीवनातील सारे ऐश्वर्य हे मातीमोल असून सुखी जीवनासाठी परमात्मारुपी धन साठवून ठेवा अशाप्रकारचे भक्तीमय उद्गार ह..भ.प. संजय महाराज वेळूकर, सातारा यांनी कोलाड येथे संपन्न होत असलेल्या अखंड नामजप सप्ताह प्रसंगी काढले.
रोहा तालुका वारकरी संप्रदायाचे सहयोगाने कोलाड विभाग वारकरी संप्रदाय यांच्या वतीने ता. १४ व १५ मे रोजी संपन्न होत असलेल्या अखंड नामजप सप्ताह प्रसंगी आपल्या किर्तनसेवेप्रसंगी उपस्थित भाविकभक्तांना संबोधित करताना ते बोलत होते.
यावेळी सर्वस्वी ह.भ.प. मारूती कोलाटकर, ,ह.भ.प.दहिंबेकर,प्रकाश थिटे, नंदू महाराज तेलंगे, भाऊ महाराज दळवी, मोरेश्वर मरवडे, तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा प्रितम पाटील, युवा नेते राकेश शिंदे, सुशील शिंदे, निशिकांत पाटील, रविंद्र सागवेकर, गणेश वाचकवडे, प्रा.शिरिष येरूणकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने भाविकभक्त व भगिनी उपस्थित होते.
पुढे ह.भ.प.संजय महाराज वेळूकर यांनी जीवन हे क्षणभंगुर असून या जीवनात जास्तीत जास्त पुण्यकर्म करून आपल्या जीवनाचे सार्थक करावे असे शेवटी सांगितले.