कर्जत | माथेरान घाटात रस्त्यावर सायंकाळी साडेचारच्या सुमारास तब्बल शंभर वर्षापूर्वीचा मोठा वटवृक्ष रस्त्यावर कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नाही.
माथेरानमध्ये गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे घाटातील धबधबे मोठ्या प्रमाणात कोसळताना दिसत आहेत. धबधब्याच्या आकर्षणामुळे माथेरानमध्ये पर्यटक येत असल्याने माथेरानच्या घाटात वाहतूक वाढली असून वाहतुकीची समस्या जाणवत आहे.
शनिवार-रविवारी माथेरानमध्ये पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. घाटात वाहतूक सुरू असताना वडाचे मोठे वृक्ष मुळापासून उपकून रस्त्यावर पडला संध्याकाळी साडेचार दरम्यान ही घटना घडली नेमकी त्यावेळेस कुठलेही वाहन येत-जात नसल्याने सुदैवाने कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.
सदरील वटवृक्ष टपरी वजा हॉटेल समोर पडला परंतु हॉटेलचे कुठल्याही प्रकारचे नुकसान न झाल्याने हॉटेल चालंकाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. वृक्ष पडल्याचे समजताच समोरील गावातील आदिवासी बांधव तसेच टॅक्सी चालक मदतीला धावून येऊन छोटासा रस्ता बनवून ऐकेरी वाहतूक चालू केली. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने वृक्ष बाजूला करून तब्बल दोन तासानी वाहतूक सुरळीत झाली.