ठाकरेंना मोठा धक्का, आमदार संतोष बांगर शिंदे गटात सामील

04 Jul 2022 11:57:51
santosh bangar
 
 
मुंबई । विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. मात्र, बहुमत चाचणी आधीच शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेतील आमदार संतोष बांगर शिंदे गटात सामील झाले आहेत. तसेच बांगर यांच्यासोबत आणखी एक आमदार श्यासुंदर शिंदे बहुमत चाचणी आधी शिंदे गटात सामील झाले आहेत. यामुळे शिंदे गटातील शिवसेना नेत्यांचा आकडा ४१ वर गेला आहे. संतोष बांगर हे हिंगोलीतील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
 
 
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्यासोबत ३९ आमदारांनी गेले. पण त्यावेळी संतोष बांगर हे ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले होते. त्यांनी बंडखोर आमदारांच्या विरोधात भूमिका घेतली होती. पण आज बहुमत चाचणी आधीच ते शिंदे गटात सामील झाले आहेत.
 
 
शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्यांवर त्यांच्या बायकासुद्धा विश्वास ठेवणार नाहीत असे संतोष बांगर यांनी बंडखोरांविरुद्ध वक्तव्य केले होते. शिवसेनेशी एकनिष्ठ राहिल्याने हिंगोली जिल्ह्यात त्यांचा सत्कारदेखील करण्यात आला होता.
Powered By Sangraha 9.0