अलिबाग | विधानसभा निवडणुकीमध्ये महेंद्र दळवी निवडून यावे यासाठी मेढेखार गावातील शिवसेना शाखाप्रमुख स्वप्नेश पाटील आणि ग्रामपंचायत सदस्या अस्मिता पाटील यांनी पिरबाबा चरणी नवस केला होता आणि पिरबाबांच्या आशीर्वादानेच महेंद्र दळवी निवडू देखील आले आणि आमदार झाले तो नवस तुला करून फेडण्यात आला.
यावेळी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी, पेण शिवसेना तालुकाप्रमुख तुषार मानकवले, शिवसेना नेते नंदू शेठ पाटील, पोयनाड विभाग संघटक महीला आघाडीच्या छाया पिंगले, शैलेश पाटील, उप विभाग प्रमुख अरविंद पाटील, महेश वावेकर, श्रीगाव ग्रामपंचायत सदस्य विकास निलकर, श्रद्धा निलकर, कुसुंबळे ग्रामपंचायत उप संरपच रसिका केणी, ग्रामपंचायत सदस्य उत्तम पाटील, जीवन पाटील, पोयनाड विभाग काँग्रेस अध्यक्ष हरिश्चंद्र म्हात्रे, संकेत पाटील, आप्पा पिंगले, स्वप्नील म्हात्रे, अभिषेक पाटील, तसेच युवा नेते नंदन पाटील, उदय ठाकूर, उदय पाटील, मोहन पाटील आदीनी उपस्थिती लावली होती.