पनवेल मध्ये राजकीय भूकंप; मनसेला मोठा धक्का

पनवेल, उरण मधील मनसेच्या 100 पदाधिकाऱ्यांचा एकनाथ शिंदे गटात प्रवेश

By Raigad Times    02-Aug-2022
Total Views |
panvel
 
 
पनवेल | पनवेलमध्ये राजकीय भूकंप झाला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार पडले आहे. आज पनवेल, उरण मधील नाराज मनसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला हा राज ठाकरे यांना धक्का मानला जात आहे. अंतर्गत राजकीय वादामुळे मनसैनिकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याचे समजते.
 
पनवेल मधील मनसेचे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, माजी खारघर शहर अध्यक्ष प्रसाद परब, यांच्यासह उरण तालुका उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष, कामगार सेना मधील पदाधिकारी, उपशहर प्रमुखसह पूर्ण मनसे खारघर मलबार हिल येथील नंदनवन बंगल्यात एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिंदे गटात पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.
 
पनवेल, उरण मधील मनसेच्या एकूण 100 पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. आमच्या नंतर आणखी मनसैनिक एकनाथ शिंदे गटात प्रवेश करतील ही यादी वाढतच राहणार आहे, असे यावेळी अतुल भगत यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
panvel2
 
  तसेच मनसे नेते अमित ठाकरे यांचे स्विय सहाय्यक महेश ओवे यांचा पनवेल महानगर पद नियुक्ती मधील वारंवार हस्तक्षेप स्थगिती याला कार्यकर्ते कंटाळले असल्याचे माजी खारघर शहर अध्यक्ष प्रसाद परब यांनी केला.
 
पनवेल मध्ये काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत दोन गट पहायला मिळत होते. मात्र अंतर्गत होणाऱ्या वाद आणि वारंवार होणारे खच्चीकरण यामुळे आम्ही बाहेर पडत असल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले.
 
याआधी सुद्धा पनवेल मधील शिवसेनेचे महानगर प्रमुख रामदास शेवाळे, रायगड जिल्हा सचिव रुपेश पाटील, उपशहर प्रमुख मंगेश रानवडे, उपशहर प्रमुख इम्तियाज शेख यांच्या सह अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.