अलिबाग | आमदार महेंद्र दळवी यांच्यासोबत शिंदे गटात गेल्यानंतर अलिबागचे माजी तालुकाप्रमुख राजा केणी यांची आज जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तीनही आमदारांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती.
गेले सव्वा महिना खरी शिवसेना कोणाची यावरून भांडण सुरू आहेत. कोर्ट कचेऱ्या सुरू आहेत. हा वाद सुरू असताना, शिवसेनेकडून बंडखोरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई सुरू आहेत, तर दुसरीकडे शिंदे गटाकडून त्यांचे पुनर्वसन केले जात आहे. तत्कालीन शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजा केणी यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना साथ दिली होती.
आमदार निष्ठेचे फळ देताना तालुका पदावरून राजा केणी यांना जिल्हा प्रमुखपदावर बदती देण्यात आली आहे, यानिवडीनंतर राजा केणी यांची आनंद व्यक्त केला आहे.
दरम्यान, विश्वास ठेवून मला हे मानाचे पद बहाल करून माझ्यावर जी जबाबदारी सोपविली आहे ती त्याच निष्ठेने पार पाडणार असल्याची प्रतिक्रिया राजा केणी यांनी व्यक्त केली.