रोहा । विजेचा शॉक लागून मेढा येथील इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. महेश दत्तात्रय सुर्वे असे त्याचे नाव होते. गावातील होतकरू तरुण गेल्याने मेढा गावावर मोठी शोककळा पसरली आहे.
मेढा गावातील विठ्ठल आळीत राहणारे महेश दत्तात्रय सुर्वे यांसह दोघेजण नवीन घराचे साहित्य बाजूला करीत होते. तेथे असलेली विजेच्या वायरचा महेश यांना शॉक लागला. यात महेश सुर्वे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ तातडीने उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे आणण्यात आले. तपासणी दरम्यान डॉक्टरांनी महेश सुर्वे यांस मृत घोषित केले.
याबाबत रोहा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.