रायगड जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; वेश्‍वीसह निवडणूका होणार्‍या ग्रामपंचायतीची नावे पहा!

By Raigad Times    08-Sep-2022
Total Views |
ghrampachayt nivadnuk
 
 मुंबई  |  रायगड जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून १३ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली असून १४ ऑक्टोबर २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
 
जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील ४, कर्जत तालुक्यातील २, खालापूर तालुक्यातील ४, पनवेल तालुक्यातील १, पेण तालुक्यातील १, पोलादपूर तालुक्यातील ४, महाड तालुक्यातील १, माणगाव तालुक्यातील ३ तर श्रीवर्धनमधील एका ग्रामपंचयातींचा समावेश आहे.
 
राज्यातील विविध १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी होणार आहे.
 
मदान यांनी सांगितले की, संबंधित तहसीलदार १३ सप्टेंबर २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र २१ ते २७ सप्टेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे २४ व २५ सप्टेंबर २०२२ रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी २८ सप्टेंबर २०२२ होईल.
 
नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १३ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी १४ ऑक्टोबर २०२२ रोजी होईल.
 
रायगड जिल्ह्यांत निवडणूक होणार्‍या ग्रामपंचायतींची नावे खालील प्रमाणे आहेत. 
election