अलिबाग । रायगडच्या जिल्हाधिकारीपदी डॉ.योगेश म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज (23 जानेवारी) ही नियुक्ती करण्यात आले असून, त्वरीत पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी डॉ.योगेश म्हसे यांच्या नियुक्तीबाबतचे पत्र जारी केले आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांची कोकण विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्याने, हे पद रिक्त होते. या पदाचा कार्यभार डॉ.कल्याणकर यांच्याकडे होता.
2009 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले डॉ.योगेश म्हसे यांनी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन लि.चे एमडी, महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट बोर्डचे चिफ ऑफिसर तसेच भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळलेली असल्याने, त्यांच्याकडे प्रशासकीय कामाचा अनुभव आहे.
विशेष म्हणजे भिवंडी मनपा आयुक्त म्हणून त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली होती. निष्कलंक, शिस्तप्रिय, पारदर्शक कामामुळे डॉ.म्हसे यांना नागरिकांचा भरभरुन पाठींबा मिळाला होता.