महाडजवळ टेम्पोला अपघात; महिलेचा मृत्यू, सहाजण जखमी

By Raigad Times    31-Oct-2023
Total Views |
 mahad
 
महाड । महाड तालुक्यातील नांगलवाडी परिसरात भरधाव टेम्पो दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातामध्ये महिलेचा मृत्यू तर सहा जण जखमी आहेत. जखमींना महाड ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.
 
अमोल अनंत रेशीम (रा. मुठवली ता.महाड) हा पिकअप टेम्पो घेऊन पोलादपूरकडून मुंबईच्या दिशेने जात होता. टेम्पो चालवताना त्याने हलगर्जीपण करत चुकीच्या दिशेने जात होता. यावेळी समोरुन आलेल्या वाहनाशी धडक चुकवताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो दुभाजकाला धडकून पलटी झाला.
 
या अपघातात टेम्पोली कुलवंती अशोक राऊत ( वय 60 . रा मुठवली ता महाड) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. सुहास मधुकर साळवी,अरुण लक्ष्मण चोरगे, ज्ञान नंदकुमार मेहता, नंदिनी नंदकुमार पालव, शीतल सुभाष राऊत, अमोल अनंत रेशीम ( सर्व राहणार मूठवली ता महाड) हे सहाजण जखमी झाले आहेत.