अलिबाग । रायगड जिल्ह्यात साखरचौथच्या गणपतीबाप्पाचे मंगळवारी विर्सजन करण्यात आले. जिल्ह्यात 292 सार्वजनिक आणि 500 हून अधिक घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.
रायगड जिल्ह्यात पेण, पनवेल, उरण, कर्जत, अलिबाग या तालुक्यांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. पेण तालुक्यात साखरचौथीच्या गणेशोत्सवाला सुरवात झाल्याचे काहीजण सांगतात. आता हा उत्सव अनेक ठिकाणी साजरा केला जातो.
दिड दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर मंगळवारी पाच वाजल्यापासून बाप्पा आपल्या गावाला निघाले. गणेशभक्तानी वाजत गाजत बाप्पाचे विसर्जन केले. विसर्जन पाहण्यासाठी नागरीकांनी अलिबाग समुद्रावर गर्दी केलेली पहायला मिळाल.