फटाक्यांनी वाढविले उरणच्या हवेतील प्रदूषण

14 Nov 2023 13:10:29
 uran
 
उरण । उरणमध्ये रविवारच्या लक्ष्मीपूजनाच्या फटाक्यांच्या जोरदार आतिषबाजीने उरणच्या हवा प्रदूषणात वाढ झाली आहे. 70 च्या आसपास असलेला हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक पुन्हा एकदा 200 च्या वर पोहचला आहे. मात्र दिवाळीचे आणखी तीन दिवस उरले असून या काळात दिवसरात्र फोडण्यात येणार्‍या फटाक्यांमुळे यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
 
त्यामुळे वाढत्या हवा प्रदूषण कमी करण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे उरणच्या नागरिकांचे म्हणणे आहे.मागील आठवड्यात उरण तालुक्यात झालेल्या अवेळी पावसाच्या सरीमुळे हवेतील धूकणाचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे उरणच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक खालावून 250 वरून 70 वर आला होता.
 
मात्र त्याचवेळी या पावसाच्या सरी बरोबर वातावरणातील धूलिकण पावसा बरोबर खाली आल्याने अनेक ठिकाणी धुळीचा धर साचलेला दिसत असून धुळीचा पाऊस झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. देशातील अतिशय वाईट हवा असलेल्या उरण मध्ये मागील अनेक दिवस 250 ते 300 पर्यत जाणार गुणांक सरासरी 200 पर्यंत होता.
 
प्रशासनाचे मात्र दुर्लक्षच: मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल मधील प्रशासन व येथील यंत्रणा वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यांच्याकडून अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत.मात्र सर्वात प्रथम देशात प्रदूषणात क्रमांक लावणार्‍या उरण मधील वाढत्या प्रदूषणावर कोणत्याही प्रकारची उपाय करण्यास धजले नाहीत. याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
Powered By Sangraha 9.0