रोहा एस.टी.स्टॅण्डवर प्रवाशांची प्रचंड गर्दी

18 Nov 2023 16:02:01
roha 
 
रोहा । दिवाळी सण व दिवाळी सणाची सुट्टी या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी माणसांची गर्दी दिसून असून रोहा एस.टी.स्टॅण्ड देखील प्रवाशांच्या प्रचंड गर्दीने गेली दोन दिवस गजबजले असल्याचे दिसून येत आहे.दिवाळी सणासाठी मुंबई-ठाणे-पुणे तसेच अन्य मोठ्या शहरात कामधंद्याला असलेले नागरिक आपापल्या गावाला येऊन सण साजरा करून कुटुंबासमवेत आनंद लुटतात.
 
तर पाच दिवसांचा हा सण संपल्यानंतर प्रत्येकाला पुन्हा आपापल्या कामधंद्याला जाण्याची ओढ लागते. तसेच काही शाळांच्या सुट्ट्याही येत्या रविवारपासून संपत असल्याने जो तो आपापल्या परतीच्या प्रवासाला निघाला असल्याने एस.टी.स्टॅण्ड आणि एस.टी.स्टॅण्डचा परिसर वाढत्या गर्दीमुळे गजबजून गेले आहे.
 
तर दिवाळी सणाच्या समाप्तीनंतर पर्यटनासाठीही काही जणांचा बेत आखलेला असल्याने पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळेही एस.टी.स्टॅण्ड आणि एस.टी.स्टॅण्डचा परिसर वाढत्या गर्दीमुळे गजबजून गेले आहे. तसेच महामंडळाच्या गाड्या काहीवेळा वाहतूक कोंडी व अन्य कारणांमुळे वेळेवर येत नसल्यानेही प्रवासी वर्गाला गाड्यांची वाट पाहत थांबावे लागत असल्याने वाढत्या गर्दीचे ते ही कारण पुढे येत आहे.
 
Powered By Sangraha 9.0