वडखळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदि शिवानी म्हात्रे व उपसरपंचपदी मत्सगंधा म्हात्रे

20 Nov 2023 16:23:18
 pen
 
पेण । पेण तालुक्यातील वडखळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंचपदि निवडुन आलेल्या शिवानी म्हात्रे यांनी वडखळ ग्रामपंच्यायतीच्या सरपंचपदाचा कार्यभार स्विकारला तर उपसरपंचपदि मत्सगंधा म्हात्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
 
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनिल जांभळे,मिलिंद मोकल, रंविद्र म्हात्रे, संजय पवार, निलेश म्हात्रे, योगेश पाटील, महेंद्र पाटील, नुतन म्हात्रे, विनोदिनी कोळी, योगिता मोकल, जयश्री म्हात्रे, कोमल म्हात्रे, अपुर्वा म्हात्रे, मनाली पाटील ग्रामसेवक विकास कुंभार आदि उपस्थित होते.
 
वडखळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदि शिवानी म्हात्रे उपसरपंचपदि मत्सगंधा म्हात्रे यांची निवड झाल्या बद्दल जिल्हापरिषदेचे माजी सदस्य प्रभाकर म्हात्रे, माजी सरपंच शरद पाटील सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर म्हात्रे व ग्रामस्थानी नवनिर्वचित सरपंच उपसरपंच यांचे अभिनंदन केले.
 
वडखळ ग्रामपंचायतीमधील रखडलेल्या विकास योजना, पाणीपुरवठा योजना, रस्ते, रोजगार आणि शासकीय योजना राबविण्यासाठी प्रयन्त करणार असुन दर गुरुवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार आसल्याचे सरपंच शिवानी म्हात्रे व सदस्य योगेश पाटील यांनी यावेळी सांगितले.
 
Powered By Sangraha 9.0