माणगावजवळ कोकण रेल्वेच्या धडकेने तरुणाचा मृत्य

By Raigad Times    24-Nov-2023
Total Views |
alibag 
 
माणगाव । माणगाव ते गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या दरम्यान कोकण रेल्वेच्या धडकेने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरची घटना बुधवार दि. 22 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली असून याबाबतची खबर राम वेटू तेटगुरे (वय-58) सध्या रा. मुगवली, ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
 
या घटनेने माणगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून हि घटना म्हणजे आत्महत्या असल्याची चर्चा तालुक्यात सर्वत्र ऐकावयास मिळत आहे.सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील मयत प्रथमेश प्रकाश तेटगुरे (वय-23) रा. मुगवली, ता. माणगाव यास माणगाव बाजूकडून गोरेगाव बाजूकडे जाणारी कोचिवल्ली 20932 विकली एक्सप्रेस रेल्वे हि इलेक्ट्रिकल पोल क्र. 34/26 च्या जवळ आल्यावर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास धडक लागून या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो मयत झाला.
 
या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि. नं. 59/2023 सीआरपीसी 174 प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आघाव हे करीत आहेत.