पनवेलमध्ये बोनस घेण्यासाठी बोलवून महिलेला शिवीगाळ

29 Nov 2023 17:19:21
 panvel
 
पनवेल । पेट्रोल पंपावर काम करणार्‍या पस्तीस वर्षीय महिलेला बोनस घेण्याकरता बोलवून तिला बोनस न देता शिवीगाळ व धमकी देऊन दोन्ही अंगावर हात उगारून धक्काबुक्की केल्याप्रकरणी मॅनेजर धनंजय देशमुख आणि चेतन याच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
 
35 वर्षीय महिला गेल्या काही वर्षांपासून भारत पेट्रोल पंप सेक्टर दोन, खारघर येथे काम करते. त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्यासाठी त्यांनी मेडिकल कार्ड बाबत विचारणा केली असता कार्ड देतो असे सांगण्यात आले मात्र कार्ड आज पर्यंत दिलेले नाही. जानेवारीमध्ये मेडिकल कार्ड बाबत विचारणा केली मात्र त्यांनी या महिलेला बसवून ठेवले, मात्र कार्ड दिले नाही.
 
जानेवारी ते मार्चपर्यंत त्यांची तब्येत बरी नसल्याने त्या घरी राहिल्या. त्या ड्युटीवर रुजू होण्यासाठी मेडिकल सर्टिफिकेट घेऊन गेले असता धनंजय देशमुख यांनी फिटनेस सर्टिफिकेट घेऊन या त्यानंतर हजर करून घेऊ असे बोलले. त्यामुळे त्या घरी आल्या. त्यानंतर सात महिने कामावर गेल्या नाहीत.
 
कंपनीने दिवाळीमध्ये सर्व कर्मचार्‍यांना बोनस दिला होता. 10 नोव्हेंबर रोजी बोनस न मिळाल्याने टीम लीटर सिद्धेश यांना फोन केला असता तुम्ही उद्या येऊन बोनस घेऊन जा म्हणून त्या 11 नोव्हेंबर रोजी बोनस घेण्याकरता आल्या. यावेळी मॅनेजर धनंजय देशमुख यांनी त्यांना पाहताच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
 
यावेळी मी बोनस घेण्यासाठी आले असल्याचे सांगितले असता धनंजय व चेतन हे दोघेही त्यांच्या अंगावर जाऊन आले व येथून चालू पड असे बोलले. त्यानंतर चेतन यांनी त्यांच्या अंगावर हात उगारून धक्के मारून बाहेर काढले. यावेळी पीडित महिलेने 112 नंबर वर कॉल करून पोलिसांना बोलावून घेतले. त्यामुळे खारघर पोलीस ठाण्यात मॅनेजर धनंजय देशमुख व चेतन यांच्या विरोधात 25 नोव्हेंबर रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
 
Powered By Sangraha 9.0