कर्जत । आमच्या वरिष्ठांनी आम्हाला गाफील ठेवलेहे सत्य असून आता टाहो फोडला जात आहे हे खरे नाही यांची सर्व हकीकत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कर्जत येथील अधिवेशन मध्ये सांगितली. तर राज्यात एकोपा ही आपली संस्कृती आहे आणि त्यासाठी राज्यात दंगली घडू देणार नाही असा ठाम विश्वास राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसीय वैचारिक शिबिरात बोलताना दिला.राज्यात सुरु असलेली चीतावणीखोर भाषणे थांबवा असे आवाहन करतानाच राज्यात जात निहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी केली.
कर्जत येथे सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय वैचारिक शिबिराचा समारोप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर भाषणाने झाली. इंडिया आघाडी वर तोफ डागताना अजित पवार यांनी भाजप सरकार मध्ये मंत्री होते मात्र आज अनेक इंडिया आघाडी सोबत आहेत. मागील इतिहास विसरता येणार नाही.
देशात अनेक पक्ष भाजपसोबत राहून आता इंडिया आघाडीमध्ये आहेत. अनेक नेते काल भाजप सोबत होते आणि आता आपल्या स्वार्थासाठी तिकडे आहेत. महाराष्ट्रात शब्दाचा पक्का अशी काही अंशी ओळख आहे हे तुम्ही जनतेला ठासून सांगितले पाहिजे. समाजात तेढ निर्माण होत असल्याने केंद्र सरकारने जात निहाय जनगणना करावी अशी आमची देखील मागणी आहे.
2 जुलैला आम्ही घेतलेला निर्णय आवडला नाही तर मग 17 जुलैला आम्हाला का बोलावले? सगळे आमदार घेऊन गेलो. चहापान झाला सगळं सुरळीत होणार आहे असे सांगत होते. त्यावेळीही गाफील ठेवले गेले. 12 ऑगस्टला उद्योगपतींच्या घरी बैठकीसाठी बोलावले. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून काम करत होतो आणि ते काम पक्षासाठी करत होतो ना? असा सवाल उपस्थित करतानाच काहीजण आता गुडघ्याला बाशिंग बांधून फिरत आहेत.
संघर्ष यात्रा काढत आहे आयुष्यात कधी केला नाही आता कशाला संघर्ष करता असा टोलाही नाव न घेता रोहित पवार यांना लगावला.जात निहाय गणना होणे गरजेचे आहे त्याशिवाय कुणाला किती आरक्षण द्यायचे हे ठरले जाईल. मात्र आज अठरापगड जातीत भांडणे होतात की काय अशी स्थिती निर्माण झाली असून शाहू - फुले - आंबेडकर यांच्या विचाराचा हाच महाराष्ट्र आहे का? असा प्रश्न सर्वांना पडत आहे असेही अजित पवार म्हणाले. आज राज्यात काय सुरू आहे याचा विचार केला पाहिजे.
कुळवाडी राजा ही उपाधी महात्मा फुले यांनी दिली. कुळवाडी म्हणजे शेतकरी आहे मात्र आज आपण प्रत्येकाला जाती जातीत विभागले आहे. एखाद्या समाजाचा मुलगा पुढे जात असेल तर इतर जातींनी द्वेष का करायचा. हे योग्य नाही असेही अजित पवार यांनी सांगितले. त्यासाठी इम्पेरिकल डेटा तयार झाला पाहिर्जेें म्हणजे मिळणारे आरक्षण कायद्याच्या कसोटीत राहील असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाचे स्वतःचे हक्काचे आरक्षण मिळायला हवे आणि ते आरक्षण देण्यासाठी आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबध्द आहे असे अजित पवार यांनी जाहीर केले.
अजित पवार यांनी त्यांना शरद पवार यांचे नाव न घेता वरिष्ठांनी कसे गाफील ठेवले आणि सत्तातंराबाबत घडलेला घटनाक्रम सांगून त्यांच्याविरुद्ध येणार्या उलटसुलट चर्चांना पूर्णविराम दिला.मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणूक लागू शकते असा माझा अंदाज आहे.त्यामुळे जास्तीत जास्त खासदार महाराष्ट्रातून एनडीए विचाराचे निवडून द्यायचे आहेत.
बारामती,शिरुर,रायगड, सातारा या खासदारकी आपण लढवणार आहोतच याशिवाय दुसर्याही जागा असतील तर शोधून काढा. त्याठिकाणी भाजप, शिवसेनेशी चर्चा करून प्रश्न सोडवू असे अजित पवार म्हणाले.पाच राज्यांच्या निवडणूका झाल्यावर आम्ही तिन्ही पक्षाचे नेते 15 डिसेंबर पर्यंत एकत्र बसणार आहोत शिवाय घटक पक्षांना सोबत घेऊन जाणार आहोत असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
आता काळ बदलला आहे,75 वर्षांपूर्वीचे आणि आताच्या लोकांच्या भावना काय आहेत. त्यांच्या समस्या कशा सोडवायच्या हे बघितले गेले पाहिजे. आपण आपली विचारधारा सोडली नाही. अल्पसंख्याक समाजाला सांगू इच्छितो उध्दव ठाकरे यांच्यासोबत काम केले. शंभर टक्के काम पूर्ण करु शकलो नाही. महायुती किंवा महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर किमान समान कार्यक्रम ठेवून काम करावे लागते.
काहीवेळा काही निर्णय घ्यावे लागतात. मात्र विचारधारा सोडलेली नाही. आपला मुळ पक्ष आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसला होता. मी विरोधी पक्षनेते पद सोडतो पक्षाची जबाबदारी द्या बोललो होतो याची आठवणही अजित पवार यांनी करुन दिली.जयंत पाटील यांनी अध्यक्ष पदाबाबत कशी चालढकल केली आणि प्रकाश सोळंके यांना अध्यक्ष पदापासून वेळकाढू भूमिका घेतली आणि टोलवाटोलवी कशी केली हा किस्सा सांगत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
घड्याळ तेच वेळ नवी,’ निर्धार नवपर्वाचा’
या अभियानातंर्गत कर्जत येथे दोन दिवसाचे वैचारिक मंथन शिबीर आज पार पडले. युवती संघटनेच्यावतीने’ अजित पर्व युवती सर्व ’देऊ उभारी घेऊ भरारी युवती आमची कारभारी या भरारी पथकाचा शुभारंभ अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला.महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे व मंत्र्यांचा सत्कार फुले पगडी व उपरणे देऊन करण्यात आला