रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पग्रस्त, अधिकार्‍यांसोबत पुढच्या महिन्यांत बैठक

20 Dec 2023 16:47:07
 nagpur
 
नागपूर । रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पबाधित शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी संबधीत अधिकारी आणि प्रकल्पग्रस्त यांची पुढच्या महिन्या बैठक बोलावून मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दिले.
 
रिलायन्स गॅस पाईपलाईनसंदर्भात आमदार महेंद्र थोरवे, यांनी तारांकित प्रश्न मंगळवारी उपस्थित केला होता. त्यावर उपप्रश्न मांडताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी मोबदल्यापासून वंचित असलेल्या शेतकर्‍यांची बाजू सभागृहात मांडली. तर आमदार महेश बालदी यांनी प्रकल्पातील एजंट व अधिकार्‍यांवर ताशेरे ओढले.
 
nagpur
 
यावर उत्तर देताना नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले, आता पर्यंत रिलायन्स कंपनीने शेतकर्‍यांना 105 कोटी रुपये वाटप केल्याचे दिसून येत असून बर्‍याच ठिकाणी शेतकर्‍यांनी विरोध केला. रिलायन्स कंपनी छोटी कि मोठी आहे. कर्तव्य शासनाला नाही तर शेतकर्‍याला त्याचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे हि सरकारची भूमिका आहे.
 
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आमदार, रिलायन्सचे अधिकारी, कोकण आयुक्त, रायगड व ठाणे जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात दिली.
Powered By Sangraha 9.0