इलेक्ट्रिक पोल बनवण्याच्या नावाखाली एमडी ड्रगचा कारखाना ;खोपोली येथून 106 कोटींचे ड्रग्ज जप्त!

09 Dec 2023 11:17:46
khopoli
 
खोपोली । खोपोलीत एमडी ड्रग् बनवणार्‍या कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून 106 कोटी 50 लाखा रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी मोस्ट वॉन्टेडसह तिघांना अटक करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक पोल बनवण्याच्या नावाखाली एमडी ड्रग्जचा कारखाना होता.
 
65 लाखांच्या यंत्रसामुग्रीसह 107 कोटी रुपयांचा मुद्देमाल यात जप्त करण्यात आला आहे.खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील मौजे ढेकु गावच्या हद्दीत इंडीया इलेक्ट्रिक पोल्स मॅन्युफॅ1रींग कंपनी या नावाचा बोर्ड लावुन हा ड्रग्जचा कारखाना चालवला जात होता.प्रत्यक्षात मात्र अंचल केमिकल या नावाने केमिकल बनवण्याचा व्यवसाय करणार्‍या कंपनीमध्ये प्रतिबंधीत केलेले अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे तयार केले जात होते.
 
खोपोली पोलीसांना या कारखान्याबाबत गोपनीय माहीती मिळाली होती.यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम व खोपोली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत व त्यांची टिमने या कारखान्यावर धाड टाकण्यात आली.कंपनीच्या चालकाकडे सदर ठिकाणी रासायनिक पदार्थ निर्मिती करणेसाठी आवश्यक असणारा शामनाचा कोणताही वैध परवाना सापडला नाही.
 
त्या ठिकाणी उग्र वास येत होता. येथे काही कच्चा माल, तसेच त्याचेवर प्रक्रीया करण्यासाठी आवश्यक साधन सामग्री असेंबल केल्याचे दिसुन आले. यामध्ये गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परीणाम करणारे पदार्थ अधिनियमातील तरतुदीप्रमाणे कारवाई सुरु करण्यात आली.
 
याबाबत तयार प क्का माल असलेली पावडर ही नाकों इन्स्पे3शन कोटद्वारे तपासणी केली असता सदर तयार केलेला माल हा एम. डी.म्हणजेच मेफेडॉन असल्याचे निष्पन्न झाले.या मुद्देमालाची एकुण किंमत जवळपास 107 कोटी 30 लाख 37 हजार 377 रुपयांचा मुद्देमाल मालमत्ता जप्त करुन सील करण्यात आलेली आहे.
 
वरील प्रमाणे केलेल्या कारवाईमध्ये तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असुन सदर बेकायदेशीर कंपनी देखील सील करण्यात आली आहे.या कारवाइत सहा.पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर, प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहाने, अभिजीत व्हरांबळे, तसेच राजेंद्र पाटील, सागर शेवते, प्रसाद पाटील,आर.एन.गायकवाड, सतीष बांगर, कुंभार,आर.डी.चैगुले, राम मासाळ, प्रदीप खरात हेपोलीस कर्मचारी सहभागी झालेले होते.
Powered By Sangraha 9.0