अलिबाग । रायगडचे भाजपचे माजी जिल्हाअध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्यावरील सर्व दोषारोप उच्च्य न्यायालयाने रद्द केले आहेत. या निर्णयामुळे अॅड. मोहीते यांना दिलासा मिळाला आहे. एका महिलेने त्यांच्यावर आरोप केले होते. यांनतर विरोधकांंनी त्याचे मोठे राजकारण झाले होते.
अॅड. मोहिते यांचे हे प्रकरण मुंबई उच्च्य न्यायालयात सुरु होते. उच्च्य न्यायालयाचे न्या. गडकरी आणि न्या. दिघे यांच्या खंडपिठाने अॅड. मोहिते यांच्यावरील सर्व दोषारोप रद्द केले आहेत. अॅड महेश मोहिते यांची राजकिय कारकिर्द बहरत असताना, गेल्या वर्षी एका महिलेने सोलापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
आपल्यावरील आरोपांचे राजकारण होत असल्याचे लक्षात येताच, अॅड. मोहिते यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. महेश मोहिते यांच्या आक्रमक राजकीय वाटचालीला यामुळे ब्रेक लागला होता. मात्र सामाजीक कार्य सुरुच होते. मुरूड आणि रोहा तालुक्यातील शेतकर्यांनी बल्क ड्रग पार्क विरोधात लढा सुरुच ठेवला.
अॅड. मोहिते यांनी शेतकर्याचा आवाज राज्य सरकार, राज्यपाल ते अगदी थेट दिल्लीपर्यंत पोहचविला होता. पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुन्हा एकदा पक्षाच्या राज्य पातळीवरील संघटनात्मक जबाबदारी सोपवून विश्वास व्यक्त केला. आता न्यायालयानेही त्यांच्यावरील दोषारोप रद्य केले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आलेले बालंट देखील आता दूर झाले आहे. अॅड. मोहिते यांच्यावरील दोषारोप उच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे मोहिते समर्थकांनी समाधान व्यक्त केला आहे.