माणगाव तालुक्यात 12500 हेक्टवर भाताचे कोठार फुलले!भात पिकाला हवामान पोषक; शेतकरी खुषीत

By Raigad Times    27-Sep-2023
Total Views |
mangaon
माणगाव तालुक्यात 12500 हेक्टवर भाताचे कोठार फुलले! भात पिकाला हवामान पोषक; शेतकरी खुषीत
माणगाव । तालुक्यात वरकस व भात पिकाचे क्षेत्र यंदाचे वर्षी घटले असले तरी तालुक्यात 206 गावातील शेतकर्‍यांनी यंदाचे वर्षी 12500 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली आहे. यंदाचे वर्षी पिकाला पोषक असा पाऊस पडल्याने भाताचे पिक पोटर्‍यात आले असून ते फुलले आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहे.
 
पावसाळ्याच्या सुरवातीच्या काळात पावसाने दडी मारल्याने बियाणे वेळेवर रुजले नाही. त्यानंतर अतिवृष्टीचा रोपांना फटका बसला होता. खलाटीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने यंदाचे वर्षी भात लावणी करण्याचे संकट शेतकर्‍यापुढे उभे ठाकले होते. त्यामुळे 80 टक्के भात लावणी उशिरा करण्यात आली होती. सुरवातीला 12 टक्के झालेल्या भात लावणी व हळवे पिक हे आता कांही ठिकाणी पोटर्‍यात आले आहे. राज्यासह कोकणात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकर्‍याकडून विविध प्रयोग करण्यात येत आहेत.
 
यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकर्‍यांचे योगदान नेहमीच मिळत असते. रायगड जिल्ह्यातील शेतकरी नवनवीन प्रयोग करीत असतानाच विविध प्रकल्प शेतकर्‍यांच्या माथी मारून इथली जमीन काढून घेतली जात आहे. त्यामुळे शेतकरी नावा पुरता उरला आहे. माणगाव तालुक्यात दरवर्षी शेकडो हेक्टर शेतीचे क्षेत्र घटत आहे. सरसरी गेल्या 6 वर्षात हे क्षेत्र कमालीचे घटले आहे.
 
गेल्या वर्षी भात पिकाचे सरासरी क्षेत्र 12589 होते. यंदा 89 हेक्टर एवढे भात पिकाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे यंदाचे वर्षी शेतकर्‍यांनी 12500 हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी केली