गद्दारांची पाळं-मुळं उखडून टाकण्याची शपथ घ्या

10 Jan 2024 17:19:46
poladpur
 
पोलादपूर । पोलादपूर ही नरवीर तानाजी मालुसरे यांची भुमी म्हणजेच निष्ठेचा वारसा असलेली भुमी तर महाड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेची भुमी आहे. येथे गद्दारी करणार्‍यांना थारा असता कामा नये. या पवित्र भुमीत गद्दारांची पाळं-मुळं उखडून टाकण्याची शपथ घ्या, असे जाज्वल्य आवाहन माजी केंद्रीय मंत्री तथा शिवसेना नेते अनंत गीते यांनी केले.
 
पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याप्रसंगी अनंत गीते बोलत होते. या देशामध्ये 2024 ला इंडिया आघाडीचे पंतप्रधान असतील. महाविकास आघाडीत गद्दारी करणार्‍या खासदारांमुळेच मला पुन्हा लोकसभा निवडणूक लढण्याची संधी मिळाली आहे.
 
राज्यातही आघाडीची सत्ता येणार असून महाडला स्नेहल जगताप आणि अनिल नवगणे यांना आमदार करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.याप्रसंगी व्यासपिठावर दक्षिण रायगड संपर्कप्रमुख संजय कदम, महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, अमित मोरे, बळीराम घाग, हनुमंत जगताप, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, दक्षिण रायगड महिला संघटिका डॉ.स्विटीताई गिरासे, शिवसेना उपजिल्हासंघटक बाळ राऊळ, सोमनाथ ओझर्डे, धनंजय देशमुख, मुरलीधर दरेकर आणि अनिल नलावडे, निलेश सुतार, अनंत पार्टे, दिलीप भागवत, दिघे मॅडम, माजी नगराध्यक्षा अश्विनी गांधी, तालुकाप्रमुख अनिल मालुसरे, सतीश शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0