पनवेल । पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने एका सराईत चोरट्यास अटक केली असून त्याच्याकडून राबोडी, डोंबिवली, खांदेश्वर, कळंबोली, रबाळे, अंटोप हील या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांमधील लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सहायक पोलीस निरिक्षक प्रकाश पवार आणि पथक पनवेल-जे एन पी टी रोडवर गस्त घालीत असताना त्यांना सराईत गुन्हेगार अब्दुल रकीब लाल मोहम्मद खान (वय 25 वर्षे रा. रबाळे) ट्रक सह संशयास्पद रीतीत मिळून आला. त्याच्याकडे कागदपत्राची विचारणा केली असता हा ट्रक चोरीचा असल्याचे पुढे आले.
अधिक चौकशी केली असता त्याने सदरील ट्रक राबोडी पोलीस ठाणे जिल्हा ठाणे येथून चोरी केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रसाद घरत यांनी तांत्रिक तपास केला असता त्याच्याकडून राबोडी, डोंबिवली, खांदेश्वर, अंटोप हील, कळंबोली, रबाळे या पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेले 7 गुन्हे उघडकीस आणल. त्याच्याकडून असा लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून डंपर चोरी करून विक्री केल्याबाबत कबुली दिली आहे.