अलिबाग। रायगडचा विस्डोम संघावर डावाने विजय

By Raigad Times    02-Jan-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग । महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आमंत्रीत 14 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत रायगड संघाने विस्डोम क्रिेकेट अ‍ॅकेडमी संघावर एक डाव आणि 19 धावंनी विजय मिळवला. या स्पर्धेतील रायगडचा हा सलग दुसार निर्णाक विजय आहे. तीन सामन्यांमध्ये रायगडने एकूण 17 गुणांची कमाई केली आहे.
 
रायगडचा चौथा सामना 3 जानेवारीपासून दक्षीण विभाग संघाविरूध्द होणार आहे. प्रथम फलंदाजी करताना रायगडने 48 षटकांध्ये सर्व गडी गमावून 205 धावा केल्या. आर्यन निकाळजे याने अर्धशतक (53 धावा) झळकावले. साहील पोपेटा (44 धावा) व पार्थ पवार (38 धावा) यांनी त्याला चांगली साथ दिली.
 
विस्डोम संघाच्या ॠतुराज सिरतोड याने 74 धावांत 4 बळी घेतले. पंकज इटकर ( 5 बळी ) व आर्यन निकाळजे (3 बळी) यांनी केलेल्या भेदक गोलंदाजी मुळे विस्डोम संघाचा पहिला डाव 97 धावांत आटोपला. रायगडने विस्डोम संघाला फॉलोऑन दिले. विस्डोमचा दुसरा डाव 89 धावांत गुडाळून रायगडने हा सामना एक डाव अणि 19 धावांनी जिंकला.
 
alibag
 
विस्डोमच्या दुसर्या डावात पंकज इटकर याने 3 बळी घेतले. अथर्व पाटील याने 4 गडी बाद केले. रायगडने पाहिल्या सामन्यात 3, दुसर्या व तिसर्या सामन्यात प्रत्येकी 7 असे एकूण 17 गुण मिळवले आहेत. रायगडच्या संघाला प्रशिक्षक व व्यवस्थापक चंद्रकांत चौधरी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते व सर्व सदस्यांनी रायगड संघाचे अभिनंदन केले.