श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पनवेलमध्ये जल्लोष

23 Jan 2024 13:04:47
 panvel
 
पनवेल । अयोध्या येथील श्री राम मंदिरात सोमवारी झालेल्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पूर्वसंध्येला पनवेलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मन हे राम रंगी रंगीले’ हा श्री रामगाथा अर्थात सुश्राव्य मराठी गीत व अभंगांचा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पनवेलमध्ये झालेल्या या गीत, अभंग, रथ, पालखीने रामलल्लाचे दर्शन घडविले.
 
पनवेल शहरातील गुजराती शाळेच्या मैदानावर झालेल्या ‘मन हे राम रंगी रंगीले’ या सुश्राव्य मराठी गीत व अभंगांच्या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र, ‘सूर नवा ध्यास नवा’ फेम सुप्रसिद्ध गायिका रश्मी मोघे व गायक जयदीप बगवाडकर यांनी श्री रामप्रभूंवरील गीते व अभंग सादर करत रामभक्तीमय वातावरण केले. विशेष म्हणजे या ठिकाणी अयोध्येत साकारणार्या राम मंदिराची प्रतिकृती, भव्य रांगोळी व अयोध्या लढ्यावर आधारित प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती त्याचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला.
 
panvel
 
स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातून सुरुवात झालेली हि पालखी पुढे हनुमान मंदिर, गावदेवी मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मार्गक्रमण करून समारोप गुजराती शाळा येथे झाले. यावेळी या ठिकाणी अयोध्या येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण, त्यानंतर भाविकांसाठी दर्शन आणि भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
 
या वेळी पनवेलमधील कारसेवकांचा व छोट्या मंदिरांतील पूजार्यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. सत्कार केलेल्या कारसेवकांमध्ये नंदा ओझे, विजय भिडे, अविनाश कोळी, उमेश मानकामे(पोद्दार), श्यामनाथ पुंडे, अशोक कदम, मकरंद निमकर, सूर्यकांत फडके, अजय आचार्य, रजनीश म्हात्रे, भूषण हजारे, सुधीर चितळे, कमल दाबके यांचा समावेश होता.
 
panvel
 
यावेळी जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, शहर अध्यक्ष अनिल भगत, अमित ओझे, ज्येष्ठ नेते सी.सी. भगत, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, संजय भगत, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, आदी उपस्थित होते.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0