रोह्यात शासकीय अन्न तंत्रज्ञान कृषी संशोधन केंद्र सुरु करणार

30 Jan 2024 11:41:48
roha
 
धाटाव । कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी करत असताना रायगड जिल्ह्यात काम करण्याची संधी खा. सुनील तटकरे यांच्यामुळे मिळाली. रोह्यात लवकरच शासकीय अन्न तंत्रज्ञान कृषी संशोधन केंद्र सुरु करणार असल्याची ग्वाही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. मुरुड येथील सुपारी संशोधन केंद्र लवकरच मार्गी लागेल असेही ते म्हणाले.
  
एम. बी. मोरे संचालित सौ. वरदा सुनील तटकरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि कै. कुसुमताई मनोहर पाशिलकर कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे भूमिपूजन व नमकरण सोहळा धाटाव येथे कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.
 
यावेळी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आ. अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी सरचिटणीस विजयराव मोरे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर, वरदा सुनील तटकरे, वेदांती तटकरे यांंची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना ना. धनंजय मुंडे पुढे म्हणाले कि, आमच्याकडे शंभर दोनशे किमी अनंतरावर नुसती जमीन दिसत असली तरी कोकणात मात्र एक दोन किमी अंतरावर नुसते पाणीच पाणी दिसत आहे.
 
अमेझोन, फ्लिप कार्ड यांसारख्या कंपनीने आता यापुढे शेतकर्‍यांजवळ केला असल्याने यापुढे राज्यातील सर्वच शेतकर्‍यांना होणार असल्याचे ते म्हणाले.यावेळी सुरेश मगर, ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील, माजी सभापती रामचंद्र सकपाळ, शिवराम शिंदे, प्रदीप आप्पा देशमुख, एम. बी. मोरे फाऊंदेशनचे अशोक मोरे, अनिल भगत, उत्तम मोरे, वकील उत्तम जाधव, मारुती खरिवले, सरपंच सुवर्णा रटाटे उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0