छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र कर्जतमध्ये

06 Jan 2024 17:51:07
karjat
 
कर्जत । कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या स्वप्नातील शिवसृष्टी कर्जत शहरात उभी राहिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाचे संपूर्ण चरित्र भित्ती चित्रांच्या माध्यमातून उभी राहिली असून या शिवसृष्टी लोकार्पण सात जानेवारी रोजी होत आहे. महाराजांचा सिंहासनाधिष्ठ पुतळा आणि तिन्ही बाजूने महाराजांच्या जीवनांतील घटनांची माहिती देणारे भित्ती चित्र त्या ठिकाणी उभारण्यात आली आहेत.
 
तर याच भागात तीन रस्त्याच्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. दरम्यान या दोन्ही ऐतिहासिक वास्तूंचे लोकार्पण आहे. कर्जत तालुका देशाच्या नकाशावर पर्यटन तालुका आणि फार्म हाऊस चा तालुका म्हणून ओळखला जात आहे.
 
कर्जत तालुक्यात शनिवार रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांच्या वाहनांच्या रांगा तालुक्यातील सर्व रस्त्यांवर दिसून येतात. त्यातील निम्मे पर्यटक हे कर्जत शहरातून तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात जात असतात.फार्म हाऊस पेक्षा आणखी काही पर्यटकांना उपलब्ध करून फार्म हाऊस पेक्षा आणखी काही पर्यटकांना उपलब्ध करून शहरातून तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात जात असतात.
 
फार्म हाऊस पेक्षा आणखी काही पर्यटकांना उपलब्ध करून देता यावे आणि त्या निमितताने पर्यटक हे काही वेळ अशा ठिकाणी बसावेत, थांबावेत अशी संकल्पना कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मनात आली आणि कर्जत तालुक्याच्या प्रवेशद्वावरचे ठिकाण असलेल्या कर्जत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र उलगडणारे शिवसृष्टी उभारण्यात आली आहे.राज्य सरकारच्या नाविन्यपूर्ण प्रकल्प मधून सदर प्रकल्पाला निधी मिळाला आहे.
 
तरुण पिढीला आणि शालेय शिक्षण घेणार्‍या विद्याथ्यारना स्वराज्याचे पहिले महाराज असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र अभ्यासायचे असल्यास कर्जत येथील शिवसृष्टी मदतगार ठरणार आहे. तर स्वराज्याचे दुसरे महाराज म्हणून ज्यांच्याबद्दल सवारना आस्था आहे ते छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कर्जत विधानसभा मतदारसंघात उभारण्याचे निश्चित करून कर्जतचे आमदार श्री महेंद्र थोरवे यांनी कर्जत -मुरबाड,कर्जत -कोंदिवडे, कर्जत-गौरकामत या रस्त्यांच्या तीन रस्त्यांच्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभे केले आहे.
 
छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती आणि संभाजी ब्रिगेड कर्जत यांच्याकडून मागील काही वर्षे संभाजी महाराज यांची जयंती साजरी करीत असतात. त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे वचन आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले होते.ते शब्द खरे करून दाखवण्याचे काम महेंद्र थोरवे यांनी आपल्या आमदारकीचं काळात पूर्ण केले आहे.
 
त्या ठिकाणी केवळ छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी करण्यात आलेली नसून परिसरात गडकोट प्रमाणे बंदिस्ती उभारण्यात आली असून अधिनिक पद्धतीने विजेची रोषणाई देखील रतरीच्या वेळी परिसराच्या वैभवात भर घालणार आहे.कर्जत शहराच्या वैभवात भर घालणार आहेत तर पर्यटन तालुका म्हणून आपली ओळख निर्माण करणार्‍या कर्जत तालुक्यातच्या पर्यटन वाढीमध्ये देखील हे प्रवेशद्वार महत्वाची भूमिका बजावणार आहे. या दोन्ही प्रकल्पाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते होणार आहे.
Powered By Sangraha 9.0