मुंबई - पुणे एसप्रेसवरून गोमांस वाहतूक करणार्‍या कारला अपघात

By Raigad Times    14-Oct-2024
Total Views |
 khopoli
 
खोपोली | मुंबई - पुणे एसप्रेसवरून अवैधरित्या गोमांस घेऊन जाणार्‍या कारचा अपघात झाला असून हा अपघात खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबईकडे जाणार्‍या दिशेला घडला आहे. या अपघातात चालक आणि एकजण जखमी झाले असून त्यांना नगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
पुण्याहून मुंबईच्या दिशेने एमएच ०१.एएल ६०८२ क्रमांकाची स्विफ्ट गाडी गोमांसाची वाहतूक करून घेऊन जात होती. साजगांव फुडमाँल हद्दीत कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कारचा अपघात घडला.मदतकार्य करीत असताना कारच्या डिंक्कीत गोमांस आढळून आले.
 
त्यावेळी पोलिसांना माहिती कळवली असता पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल होत अपघातातील कार सह दोघांना अटक केली. ते दोन्हीही आरोपी जखमी असल्याने त्याने नगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करीत उपचार करण्यातआले.
 
प्राणी संरक्षण कायद्या बी.ए.२०२३ नुसार कलम३२६, २८१, १२५ अ, १२५, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खोपोली पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक घेवारे अधिक तपास करीत आहेत.