आमदार महेंद्र दळवी यांनी साधला युवकांशी संवाद

By Raigad Times    14-Oct-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग | अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी रविवारी मतदारसंघातील तरुणाशी संवाद साधला. सुरुवातीलाच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्यामागचे कारण अधोरेखीत केले. यानंतर तरुणांचे प्रश्न समजून घेण्याचा आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकारण करण्याचा प्रयत्न केला. अलिबागनजीक सहाण बायपास येथे युवा संवाद कार्यक्रमाचे निमित्ताने आमदार महेंद्र दळवी यांचे कार्यकर्त्यानी जोरदार स्वागत केले.
 
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार कालखंडात अलिबाग विधानसभा मतदारसंघात सर्वागिण विकास करण्याचा निश्चित प्रयत्न केला असे उद्?गार काढले. यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी, गेल्या पाच वर्षातील काळातील आठवणींना उजाळा दिला, विकास कामांना चालना मिळत नसल्यानेच गुहावटीचा मार्ग पत्करल्याचा खुलासा त्यांनी केला. मुरूडचा कायापालट करताना १५० ते २०० कोटी रूपयांचा निधी दिला असल्याचे सुतोवाच केले.
 
सर्वागिण विकासासह वैयक्तीक मदतीचा हात सुध्दा नेहमीच ठेवला असल्याचे सांगितले. भविष्यात चणेरा नजीक आरसीएफचा प्रकल्प तसेच खासदार सुनिल तटकरे यांचे समवेत अलिबाग या जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आयटीसाठी विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले.
 
एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अलिबाग-मुरूड विधानसभा मतदार संघातून आमदार महेंद्र दळवी यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. या कार्यक्रमात व्यासपिठावर माजी जि.प.सदस्या मानसी दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी, जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष निगडे, खजिनदार सुरेश म्हात्रे, दिपक रानवडे, आदिती दळवी, जुईली जुईकर, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, तालुका प्रमुख अनंत गोंंधळी आदी उपस्थित होते.